Thursday, July 30, 2026
HomeChamorshiचामोर्शी येथील श्री. माता माऊली उत्सवाला माजी खासदार अशोकजी नेते यांची सदिच्छा...

चामोर्शी येथील श्री. माता माऊली उत्सवाला माजी खासदार अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, ०४ फेब्रुवारी २०२५::-चामोर्शी येथील(तेलंग मोहल्ला) – श्री माता माऊली मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने श्री माता माऊली उत्सव व माऊली स्थापना सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या धार्मिक कार्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मंदिरात माता माऊलीचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी मोहल्ल्यातील समस्या जाणून घेतल्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी तेलंग मोहल्यातील नागरिकांनी मा.खा.अशोकजी नेते यांचे शाल श्रीफळ देत सत्कार केला.या प्रसंगी नगरसेविका रोशनीताई वरघंटे, शहर महामंत्री नरेशजी अल्लसावार, तालुका महामंत्री अतुलजी केशवार, सेवा निवृत्त न्यायाधीश दीक्षित साहेब, तसेच प्रविण मारकवार,

मंगेश हाडगे, मंगेश सदुलवार, किशोर सदूलवार, किशोर कावटवार, प्रफुल्ल कोत्तावार, साईनाथ आडपवार, अनिल सदुलवार, वनश्री सद्दुलवार, कृपा कावटवार यांसह मोहल्ल्यातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उत्सवानिमित्त गोपाल काला, होम-यज्ञ तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. उपस्थित भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घेत माता माऊलीची कृपा प्राप्त करण्यासाठी दर्शन व पूजा अर्चा केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular