Thursday, October 8, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुक्यातील रेगडी हळदवाही भागातील बारा ग्रामपंचायतील घरकुल लाभार्थ्याना बांधकामा करिता प्रत्येकी...

चामोर्शी तालुक्यातील रेगडी हळदवाही भागातील बारा ग्रामपंचायतील घरकुल लाभार्थ्याना बांधकामा करिता प्रत्येकी पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावे – डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव करण्यात यावे, तसेच तालुक्यातील समस्त घरकुलधारकांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावे – डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,

रेगडी हळदवाही भागातील बारा ग्रामपंचायतींना रेती उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तालुक्यात विराट जन आंदोलन उभारू,

डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचा इशारा.

गडचिरोली/चामोर्शी १८ फेब्रुवारी २०२५::- तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नदी नाले आहे व शासन निर्देशित रिती घाट उपलब्ध आहेत परंतु या रेती घाटाचा लिलाव न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रीतीने विविध रेती घाटातून रेती उपसा सुरू आहे सदर रेती उपसा तात्काळ बंद करण्यात यावा व कायदेशीर समस्त रेती घाटाचा लिलाव करण्यात यावा तसेच तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुलाचा लाभ दिला आहे परंतु सदर घरकुल पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील कोणताही रेती घाट उपलब्ध नसल्याने नागरिकांना रेती घाटासाठी आपले घरकुल बांधकाम थांबवल्याशिवाय पर्याय नाही यामुळे शासकीय कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत त्यामुळे तालुक्यातील समस्त घरकुलधारकांना किमान पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच रेगडी हळदवाही भागातील बारा ग्रामपंचायतींना रेतीची उपलब्धता करून देण्यात यावी रेगडी भागात महसूल विभागाचे नदी नाले नसल्याने परवानगीसाठी खूप त्रास घ्यावा लागत आहे या भागात मोठया प्रमाणात वनविभागाचे नाले व काही भाग आहे यावेळी वनविभाग रेती उपसा करण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे खूप समस्या येत आहे तरी प्रशासनाने रेगडी हळदवाही भागातील बारा ग्रामपंचायत साठी डम्पिंग यार्ड तयार करून रेतीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले, व प्रशासनास इशारा दिला अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात सदर मागणीच्या पूर्ततेसाठी समस्त घरकुलधारक व घर बांधकाम करणारे नागरिक यांचा विराट जन आंदोलन उभारण्यात येईल तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सदर मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना युवा नेते प्रशांत शहा, सुमेन विश्वास रेगडी हळदवाही क्षेत्रातील भोजराज क्षीरसागर, अतुल एनगंटीवार,अशोक मेश्राम,यशोदा पोटावी, शशिकला रापंजी, दिवाकर पुंगाटी, रमेश कन्नाके,सागर राय,दीपक पुंगाटी, प्रणय बारसागडे,रुपेश वनकर, रितेश कोहपरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular