VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
समाजकारण, राजकारण आणि शिक्षणाचा त्रिवेणी संगम!
गोवा, ९ मार्च २०२५::- समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात समतोल साधत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे मा.खा.तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना साउथ-वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए तर्फे ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.हा विशेष सन्मान प्रदान करण्यासाठी आज दिं. ०९ मार्च २०२५ ला ‘द क्राउन हॉटेल’, गोवा येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक समितीने त्यांना स्मृतिचिन्ह, अधिकृत पदवी प्रमाणपत्र आणि विशेष मानचिन्ह प्रदान करून गौरविले.

समाजकारण, राजकारण आणि शिक्षण – एक अद्वितीय समन्वय!
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध विकासात्मक योजनांना चालना दिली. राजकीय नेतृत्वाबरोबरच समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत ते एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

राजकारणाच्या धावपळीच्या जीवनशैलीतही शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विसरले नाही. त्यांनी शैक्षणिक उंची वाढवत प्रथम श्रेणीत पदवी घेत शिक्षण पूर्ण केले आणि आज, अमेरिकेतील नामांकित विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेतली आहे.

समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व!
मा.खा.तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांचा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”आज डॉक्टर झालो असलो, तरी हा केवळ सन्मान नसून समाजासाठी अधिक जबाबदारी घेण्याची संधी आहे.

शिक्षण आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम साधत, नव्या उर्जेने समाजासाठी कार्यरत राहीन.”अशा शब्दांत त्यांनी नम्रतेने आपली भावना व्यक्त केली.

अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव!
या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्रजी विश्वास, स्वीय सहाय्यक अजय सोनुले, सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.तसेचसाउथ-वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

समाजासाठी नव्या उंचीवर कार्यरत राहण्याचा संकल्प!
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचा हा सन्मान म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासाची नोंद आहे. राजकारण, समाजसेवा आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम साधत त्यांनी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडली आहे.या गौरवसोहळ्यात, मा.खा. अशोकजी नेते यांनी स्वतः ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क’ पदवी प्राप्त करून,देशभरातील समाजात भरीव योगदान देणाऱ्या ३० व्यक्तींना ‘डॉक्टर’ पदवीने गौरविण्याचा सन्मान मिळवला.

‘भागवत गीता सुधा’ ग्रंथ भेट – विशेष गौरव!
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांना या विशेष सोहळ्यात ‘मुख्य अतिथी’ म्हणून मानाचा दर्जा प्राप्त झाला. त्यांच्या नेतृत्वाचे आणि समाजकार्याचे कौतुक म्हणून त्यांना ‘भागवत गीता सुधा’ या पवित्र ग्रंथाने गौरविण्यात आले.त्यांच्या या गौरवामुळे समाजासाठी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
