Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुका क्रीडांगण, रस्त्याच्या समांतर बनवण्यात यावे! तोपर्यंत क्रीडांगणाचे काम थांबवण्यात यावे...

चामोर्शी तालुका क्रीडांगण, रस्त्याच्या समांतर बनवण्यात यावे! तोपर्यंत क्रीडांगणाचे काम थांबवण्यात यावे – पप्पी पठाण तालुका अध्यक्ष शिवसेना ( शिंदे गट)…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, १० मार्च २०२५::- चामोर्शी येथे तालुका क्रीडांगणाचे काम सुरू आहे व सदर क्रीडांगण येथील मुख्य कालव्याच्या खालच्या बाजूस आहे. सध्या क्रीडांगणाचे काम रस्त्यापासून कितीतरी खालच्या पातळीवर सुरू आहे. या ठिकाणी आधीच दरवर्षी भरपूर पावसामुळे तलावा प्रमाणे पाणी साचून राहतो. आणि क्रीडांगणाच्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. सुरु असलेले काम अतिशय बोगस दर्जाचे दिसून येत आहे. या ठिकाणी होत असलेले क्रीडांगणाचे विविध काम हे मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सदर क्रीडांगणाचे नवीन इस्टिमेट तयार करून रस्त्याच्या समांतर क्रीडांगण बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाण्याचा त्रास होणार नाही. कारण या ठिकाणी रस्ता उंच क्रिडांगण खाल अशी अवस्था आहे. त्यामुळे सदर क्रीडांगणाचे बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे व नवीन इस्टिमेट मंजुरी नंतरच क्रीडांगणाच्या कामाला सुरुवात करण्यात यावे, अशी मागणी (शिवसेना शिंदे गट) तालुका अध्यक्ष पप्पी पठाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular