Saturday, May 23, 2026
HomeAheriशिलमपल्ली येथील युवकांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल - नेट दिली...

शिलमपल्ली येथील युवकांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल – नेट दिली भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, १० मार्च २०२५::- तालुक्यातील शिलमपल्ली येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य युवकांनी घेऊ शकत नव्हते.आज येथील युवकांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कंकडालवार यांनी त्या युवकांची अडचण लक्षात घेऊन युवकांना क्रीडा साहित्य खरेदी करून दिले.त्यामध्ये व्हॉलीबॉल,नेट आणि इतर काही वस्तू आहे.या साहित्यामुळे शिलमपल्ली येथील क्रीडा युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी गावातील समस्त क्रीडा युवकांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायतचे कवडूजी चालवार,उपसरपंच संतोष गावडे,अनिल आलम, कृष्णा वर्षे,उमेश वर्षे,चंदू आलम,तिरुपती कुळमेथे,नागेश कुळमेथे,रमेश वेलदी,चिन्ना वेलादी,सत्यम गावडेसह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular