Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्रत्यक्ष गती देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- डॉ प्रणय भाऊ खुणे...

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्रत्यक्ष गती देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- डॉ प्रणय भाऊ खुणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ११ मार्च २०२५:- राज्यात औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, कृषी सुधारणा आणि हरितक्रांती व ऊर्जेसह सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पातुन साधला आहे. उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज उद्योगासाठी 21 हजार 830 कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणे ही बाब गडचिरोली जिल्ह्याला सुजलाम सुफलामते कडे नेण्याच्या व सामाजिक आर्थिक शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे.

त्यातून केवळ मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच होणार नाही, तर भौतिक सुविधांच्या बाबतीतही गडचिरोली जिल्हा मोठया प्रमाणात स्वयंपूर्ण होईल. याशिवाय प्रत्येक तालुक्यात बाजार समित्यांची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या कृषीमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरकुलांच्या अनुदानात 50 हजारांची वाढ करण्याचा निर्णय अर्थमंत्री अजितदादांनी या अर्थसंकल्पातुन जाहीर केला. त्यामुळे हा केवळ महाराष्ट्राच्या समृद्धीला गती देणारा अर्थसंकल्प नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा ठोस कृती आराखडाच आहे! महाराष्ट्र राज्याला सुद्धा न्याय मिळाला आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा न्याय मिळाला आहे असे अर्थसंकल्पातून डॉ, प्रणयजी खुणे यांनी प्रतिपादन केले.

डॉ,प्रणयजी खुणे, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, गडचिरोली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular