VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,१३ मार्च २०२५::- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विधुत कर्मचारी संघटनेची प्रविभागीय कार्यकारिणी 12 मार्च रोजी गडचिरोली येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. प्रविभागीय अध्यक्ष पदी लक्ष्मण थाटकर तर सचिव पदी सुधीर चौधरी यांची निवड करण्यात आली.प्रविभागीय संघटनेची सन 2025 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्ष पदी चंद्रपूर परिमंडळ अध्यक्ष सि. यू सडमेक होते. मार्गदर्शक मनून परिमडलं सचिव कुणाल पाटील उपस्थित होते. सुधीर चौधरी यांची सलग चौथ्यादा निवड करण्यात आली. सभेला संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी जे. पी. मेश्राम मिथुन शेंडे.धनराज नन्नावरे.योगेश सलामे.अरविंद राजगडे.राज राहुलगडे.सागर मसाडकर.विजय सहारे. अविनाश भैसारे. सुरेश वराटे. सुरेश रामटेके. सचिन ढोके. राहुल शहारे. करुणा कराडे. बी. टि. बोरकर नितीन वाघमारे.अनिल नवले. खिलोज बरसागडे. विजू दिवटे केतुल नवघडे.उपेंद्र तवाडे. नुतेश रोहनकर. विकास सेलोटे आदींनी सहकार्य केले.
