VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
येथील ग्रामसभेचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांना निवेदन.
गडचिरोली/भामरागड, २० मार्च २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या छत्तीसगडला लागून असलेला भामरागड तालुका आजही अनेक मूलभूत सोयी सुविधांच्या महत्त्वाच्या समस्यांनी ग्रसित आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय येथे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे,भामरागड ग्रामीण रुग्णालय येथे एका मेडिकल ऑफिसर वर संपूर्ण रुग्णालय चालत आहे या ठिकाणी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी तात्काळ देण्यात यावे त्याप्रमाणे मागील दोन वर्षापासून येथील महावितरण कंपनीची दुरावस्था आहे भामरागड येथे सबस्टेशन देण्यात आले आणि सदर सबस्टेशन एका अभियंतावर चालत आहे सदर अभियंता यांचे सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष आहे त्याचप्रमाणे भामरागड तालुक्यातील संपूर्ण गावे पेसा मधे आहे या ठिकाणी एचली किअर,करमपल्ली बांडेनगर व नगरपंचायत भामरागड मध्ये हेमलकसा नदी जोडून आहे व त्या ठिकाणी राज्य सरकारचा शासकीय रेतीघाट तयार होऊ शकतो त्यामुळे पेसा कायदा अंतर्गत लवकरात लवकर येथे रेती घाट तयार करण्यात यावा रेतीघाट नसल्यामुळे या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा चालत असतो तरी राज्य शासनाने या सर्व समस्या कडे लक्ष देऊन तात्काळ दूर करावे अशी मागणी येथील भाजपा तालुका अध्यक्ष अर्जुन आलाम, सिताराम मडावी समाजसेवक जिजगाव, संजय येजुलवार उपसरपंच येचली, मनोज पोरटेत, सरपंच ग्रामपंचायत पल्ली तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव वनकर यांनी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भामरागड तालुक्यातील ग्रामसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
