Saturday, September 12, 2026
HomeBhamragadअनेक दशके उलटून सुद्धा भामरागड तालुका विकासाच्या प्रतीक्षेत...

अनेक दशके उलटून सुद्धा भामरागड तालुका विकासाच्या प्रतीक्षेत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भामरागडातील ज्वलंत समस्यांवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांना निवेदन,

गडचिरोली /भामरागड,२९ जून २०२६::- देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आजही विकासाची गंगा आज तागायत पोहोचलेली नाही. रस्ते आणि पुलांअभावी या भागातील जनसामान्य, गोरगरीब जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आजही आजारी रुग्णांना खाटेवर टाकून, जीव धोक्यात घालून नदी-नाले पार करावे लागत असून, या भागातील भावी पिढी म्हणजेच लहान मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

धोढराज-इरपणार नाल्यावर पूल नसल्यामुळे एका गरोदर मातेला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच याच भागात एका शिक्षकालाही आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर परिस्थितीची परिसरातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना निवेदन सादर करून या ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा केली.

निवेदनात मांडलेल्या प्रमुख समस्या :- 

रस्ते आणि पुलांचा अभाव आरोग्य सेवांची अत्यंत कमतरता शाळा व शिक्षण सुविधांचा अभाव पिण्याच्या पाण्याची समस्या वीजपुरवठा आणि नेटवर्क समस्या शेतकन्यांना सिंचन व बाजारपेठेची सोय नाही.

निवेदन देताना भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, प्रवीण गेडाम व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी आजही पक्के रस्ते आणि पुल नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात धालून नदी-नाले ओलांडावे लागतात. विशेषतः पावसाळ्यात अनेक गावे बाहेरील संपकापासून तुटतात. त्यामुळे आजारी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, तर विद्याथ्यांचे शिक्षणही मोठ्या प्रमाणात बाधित होते.

याबाबत डॉ. प्रणयभाऊ खुणे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी भामरागड तालुक्यातील रस्ते, पूल, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कारवाई करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची तालुक्यातील रस्ते, पूल,आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली.

निवेदन देताना उपस्थित मान्यवर :-

डॉ. प्रणयभाऊ खुणे (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) भीमराव वनकर (भामसागड तालुकाध्यक्ष) प्रवीण गेडाम (सदस्य)

 डॉ. प्रणयभाऊ खुणे यांचे आश्वासन :-

नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. संबंधित प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दुर्गम भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध आहे.

डॉ. प्रणयभाऊ खुणे यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच दुर्गम भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध असल्यांचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular