VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, २० मार्च २०२५::- रमजान हा मुस्लिम धर्माचा पवित्र सन आहे. भारत हा देश विविध जाती पंथ धर्मा नटलेला देश आहे. प्रत्येक धर्माची रीती रीवाज वेगवेगळे असतांना सुद्धा हिंदू. मुस्लिम. सिख. इसाई हम सब है भाई भाई. हा संदेश देण्याकरिता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी आपल्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अहेरी येथे आयोजित केला. अहेरी येथील मुस्लिम महिला पुरुष.बालगोपालांना रमजान महिन्यात मदरसा येथील मुलांना वस्त्र दान केले व इतर गरीब महिलांना आनंदाचा सेवइ शिधा वाटप केले मुस्लिम बांधव प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचा अभिनंदन केले आहे.

यावेळी विदर्भ अध्यक्ष जावेद अली. जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा सचिव रतन दुर्गे. जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. सचिव साई औतकर. सह सचिव सुरेश दुर्गे.रोशन सय्यद. अमोल अलोणे महिला पुरुष व बालगोपाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ प्रणय खुणे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पूर्ण 30 दिवस रोजा (उपवास ) करतात यात 7 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध महिला व पुरुष रोजा ठेऊन अल्लाहची उपासना करतात. या रमजान महिन्यात अनेक लोक गोर गरीब जनेला मदत करतात. ही संकल्पना ठेऊन डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटने तर्फे मदत केली.याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील मुस्लिम बांधव यांनी डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचा सत्कार आहे.यावेळी अहेरी मस्जिद कमेटी चे पधाधिकारी सय्यद सर. मखमूर हुसेन शेख. जावेद अली. सर्फराज आलम. रोशन सय्यद वहिरे येथील मुस्लिम समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
