VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, ०५ एफ्रील २०२५::- तालुक्यातील तुमीरकस्सा अंतर्गत येत असलेल्या मेडपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंचा स्व.इरपे महारू तलांडे यांचे काल दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले होते.या दुःख निधनची माहिती मेडपल्ली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच निलेश वेलदी यांनी कल रात्री कंकडालवारांना दिल्याने आज सकाळी अंतिम दर्शनासाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी तुमीरकस्सा येथे जाऊन येथील तलांडे कुटुंबांची भेट देऊन त्यांचे आस्थेने स्वांत्वन केले.यावेळी निलेश वेलादी सरपंच ग्रामपंचायत मेडपल्ली,दिवाकर तलांडी,पल्लो पाटाळी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरीसह आदी उपस्थित होते.

