Monday, September 14, 2026
HomeChamorshiविश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन...

विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०७ एप्रिल २०२५::- दिनांक 4 एप्रिल 2025 रोज शुक्रवार ला विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अरुण राऊत आणि पर्यवेक्षक श्री संतोष सुरावार यांच्या विशेष प्रयत्नाने सी. एस. आर. निधी मधून प्राप्त झालेल्या स्मार्ट क्लासरूम चे उदघाटन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. माननीय राजूभाऊ बेजगमवार यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा समितीचे सदस्य श्री सुनील भाऊ बल्लमवार उपस्थित होते.

विशेष अतिथी म्हणून भेंडाळाच्या सरपंचा सौ कुंदाताई जुवारे, मोहुरलीचे सरपंच श्री सुधीर भाऊ शिवनकर,नवेगाव माल च्या सरपंचा सौ सोमलता चौधरी, उपसरपंच श्री चरणदासजी चौधरी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री लचमा शिरगावार, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ नंदिनी ताई कडस्कर भेंडाळाचे पोलीस पाटील श्री श्रीरंगजी मशाखेत्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री गोकुळदास झाडे , प्रस्ताविक शाळेचे पर्यवेक्षक श्री संतोष सुरावार यांनी केले,तसेच उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण राऊत यांनी मानले . तांत्रिक बाबींची माहिती श्री योगेश नवघडे आणि भुवनेश्वर चुधरी यांनी दिली. कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना भेंडाळाच्या सरपंचा सौ कुंदाताई नरेंद्र जुवारे यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करताना अश्या सुविधा निर्माण झाल्यामुळे शाळेचे विद्यार्थी तंत्रज्ञानाशी अवगत होऊन त्यांच्या बुद्धीचा अधिकचा विकास होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन श्री धनंजय गाडेवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular