VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, २० एप्रिल २०२५::- अहेरीतील विठ्ठल रखुमाई देवस्थान येथे अहेरी तालूक्यातील भाजप पदाधिकारी तथा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.मागिल महिण्यापासून सुरु असलेल्या भाजपच्या तालुकाध्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यातील रितसर प्रक्रीया निवडणूक अधिकारी श्री दामोधर अरीगेला यांच्या ऊपस्थितीत पार पडली.

प्रदेश कार्यकारणीच्या निर्देशानुसार सर्वानुमते विकास रमेश तोडसाम यांची तालुकाध्यक्ष म्हणुन अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.सर्व पदाधिकार्यांनी विकास तोडसाम यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.*विकास तोडसाम यांनी सर्व पदाधिकारी व विशेषत्वे राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे आभार मानले.
