VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/घोट २४ एप्रिल २०२५::- दिनांक 20 एप्रिल रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय घोटच्या वतीने रेगडी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सामूहिक वनहक्क समिती यांची एक दिवसीय कार्यशाळेचे रेगडी येथे आयोजिन करण्यात आले संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचे सामूहिक ग्रामीण परीक्षण करणे करिता एकदिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. वनालगतच्या गावामध्ये स्थापन केलेले संयुक्त वन व्यवस्थापन समित्या व सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समित्या यांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी वन कर्मचारी व अधिकारी यांचे समन्वयाने वणाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज असून पुढील पिढी करिता आपण वनक्षेत्र राखून ठेवावी असे प्रतिपादन विभागीय वनअधिकारी नरेंद्र चांदेकर यांनी केले.

याप्रसंगी मानद वन्यजीव संरक्षण नागपूरचे अविनाश लोंढे,शासकीय विज्ञान संस्था नागपूरचे श्रीकांत बोरकर,घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे,चामोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर बी इनवाते, मार्कंडा कं वनपरीक्षेत्र अधिकारी तनुजा मोडले,परिक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजीराव पानंगे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घोट वनपरिक्षेत्रातील वनपाल आर आर मेश्राम,डी दुधबडे,डी.बी निमरड यांनी परिश्रम घेतले कार्यशाळेला घोट,चामोर्शी, मार्कंडा वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक विकासपल्लीचे क्षेत्रसहाय्यक पि.के इटकेलवार यांनी केले.
