Tuesday, July 28, 2026
HomeDhanoraगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ "भवरागड " देवस्थान विकासापासून कोसो...

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ “भवरागड ” देवस्थान विकासापासून कोसो दूर…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली जिल्ह्याला राज्य शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे,

प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,

गडचिरोली/ धानोरा, २९ एप्रिल २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक निसर्ग रम्य ठिकानी प्राचीन मंदिरे आहेत परंतु राज्य व केंद्र सरकारच्या जिल्ह्यतील पर्यटन स्थळाकडे दुर्लक्षितपणामुळे सदर मंदिरे धुळखात पडलेले आहेत सदर मंदिराची भग्न व जीर्णवस्थेमुळे या ठिकाणी पर्यटक येत नाही.

त्याच प्रमाणे राज्य केंद्र सरकारकडून येथे कोणतीही सोयीसुविधा करण्यात आला नाही विशेष बाब म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांना राज्य सरकारने ( क) वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा व धानोरा पासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य भवरागड पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी अगदी जवळूनच नदी वाहत असल्यामुळे भवरागड मंदिरास एक वरदान प्राप्त झाला आहे परंतु या मंदिराच्या उपेक्षितपणामुळे जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटक या ठिकाणी येत नाही हा स्थळ केंद्र, राज्य सरकारने लक्ष देऊन विकास केला तर या ठिकाणी खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो व गावातील सर्वसामान्य गोरगरीब युवक नागरिक यांना सुद्धा रोजगाराचे चांगले दालन उघडे होऊ शकते.

आज या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या पर्यटन स्थळाची पाहणी केली व येथील नागरिकांसोबत सुद्धा प्रत्यक्ष संवाद साधला यावेळी येथील नागरिकांनी या पर्यटन स्थळाचा विकास करण्याची मागणी केली गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात अशा प्रकारचे निसर्ग रम्य ठिकाणी अनेक मंदिरे आहेत परंतु राज्य सरकारने व केंद्र सरकारने येथील पर्यटन स्थळाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही व स्वातंत्र्याचे इतक्या वर्षापासून आजही सदर अनेक मंदिरे व या ठिकाणी असलेली गावे विकासाची वाट बघत आहेत* *व प्रामुख्याने ज्याप्रमाणे देशांमध्ये गोवा हा राज्य पर्यटन राज्य आहे त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा सुद्धा राज्य सरकारने व केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा ताई मडावी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular