VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन,
गडचिरोली/ मुलचेरा, २९ एप्रिल २०२५::- सल्ला गांगरा शक्ती स्थापना सप्तरंगी ध्वजारोहण तथा क्रांतीसूर्य आदिवासी समाजाचे आराध्या दैवत शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण व सामाजिक संस्कृतीक कार्यक्रम सोहळा दि.28 एप्रिल 2025 रोजी सोमवारला मुत्तेल अक्का पेन चौक मुखडी टोला मच्छली येथे परिसरातील व स्थानिक अनेक आदिवासी बांधवांचा उपस्थित उत्सहात मोठ्या थाटात संपन्न झालं आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ व काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या करण्यात आली.या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी गडचिरोली संदीपभाऊ कोरेत हे होते.

कार्यक्रमचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,उपाध्यक्ष म्हणून जिल्हा महाग्रामसभा सचिव नितीनदादा पदा होते.कार्यक्रमाचे रूपरेषा कार्यक्रमांचा पहिला दिवशी म्हणजे 27 तारीख रोजी रविवारीला मातापूजन,कार्यक्रमांचा दिवशी पाहुण्यांचे स्वागत व गावरैली तसेच ठिकाणी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाही आयोजित केले आहे.

त्यावेळी पारंपरिक पद्धतीने अजय कंकडालवार व मान्यवरांचे स्वागत,सत्कार करण्यात आली.तसेच ठिकाणी 4 जोडप्याच्या एकाच मंडपात सामूहिक लग्नाही पार पडला.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार ईश्वर मडावी,प्रभाकर मडावी,दिनेश उरते,मारोती आलम,रघुनाथ उरते,जानकीराम सिडाम,लिंगा उरते,दर्शन गेडाम,कयूमभैया, ताशूभैया,विज्ञा,सुरेश मडावी,उमेश कडते,विनोद मडावी, गणेश कोटरंगे परिसरातील,स्थानिक आदिवासी बांधव व समस्त गावकरी तसेच आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

