Friday, September 11, 2026
HomeDhanoraमुरुमगाव आश्रमशाळेत आमदार रामदास मसराम यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; शैक्षणिक सुविधांची घेतली पाहणी...

मुरुमगाव आश्रमशाळेत आमदार रामदास मसराम यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; शैक्षणिक सुविधांची घेतली पाहणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /धानोरा | दि. ६ सप्टेंबर २०२६ :धानोरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, मुरुमगाव येथे आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी भेट देत शाळेतील शैक्षणिक व इतर व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, शैक्षणिक प्रगती तसेच शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

आमदार मसराम यांनी शाळेतील विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि दैनंदिन व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपल्या विविध समस्या व अपेक्षा आमदारांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ मिळणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक व प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार मसराम यांनी केले.

यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, कमलेश बारस्कर, मुरुमगाव सरपंच गवरला जी, अधीक्षक भालेकर, मुलींच्या अधीक्षका कांबळे, शिक्षिका भोयर मॅडम, सिस्टर मुरतेली मॅडम, शिक्षक निसार सर, साखरे सर व कांबळे सर यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

आमदारांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular