VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र दिनी पाणपोईचा शुभारंभ,
गडचिरोली, ०१ मे २०२५::- पाणी हे जीवन आहे. तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. उन्हाळ्याच्या तप्त उन्हात रस्त्याने जाता- येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले की हायसे वाटते. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते.

या मार्गावर अनेक खाजगी दवाखाने सुध्दा आहेत. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामासाठी शहरात येतात. उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरुंना शुध्द व थंड पाणी मिळावे या हेतूने जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालया समोर पाणपोईची सुविधा निर्माण केली असून आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पाणपोईचा श्रीगणेशा करण्यात आला.

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मोठी भीषण समस्या असते. रस्त्याने फिरताना तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की पाणपोईकडे धाव घेते. आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरविल्यानंतर मनाला शांती व गारवा मिळतो. चामोर्शी मार्गावरील अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात खाजगी रूग्णालये आहेत. ट्युशन क्लॉसेस घेणाऱ्या संस्था तसेच जवळच राज्य परिवहन महामंडळाच्या बसथांबा आहेत. त्यामुळे रस्त्याने येजा करणारे नागरिक, प्रवाशी आणि शाळेकरी व टयुशन क्लॉसेसेच विद्यार्थी यांची संख्या मोठी असते. या सर्वांना पिण्याचे थंड पाणी मिळावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी पाणपोई सुरू केली आहे.

त्यामुळे चामोर्शी मार्गावरील तहाणलेल्या वाटसरूंना दिलासा मिळणार आहे.या पाणपोई शुभारंभ प्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपालजी मोगरकर, संजय बोबाटे, स्वप्नील जुमनाके, देवेंद्र मुळे, राजेंद्र मेश्राम, प्रभाकर मेश्राम, धनराज ढेंगे, मयुर मेश्राम, लोकेश जुमनाके, ताराचंद्र पिपरे, सत्यम पिपरे, सुनिल कन्नाके, राजेंद्र भैसारे, विलास ढोलणे, स्वप्निल मांडवकर, विनोद पाथर, राहुल सावरकर, दिलीप वलादे, प्रशांत ठाकुर, कुमदेव आवारी, यशवंत सिडाम, दिपक कोसमशिले, राजेंद्र जवादे, प्रज्वल ठाकरे, लंकेश सयाम, मधुकर बावणे, तेजस धंदरे, अमित हुलके, निलकंठ खोब्रागडे उपस्थित होते.
