VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/आष्टी, ०५ मे २०२५::- प्राप्त माहिती निसार नमूद घटना ता.वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी दि. 24/04/2025 रोजी सकाळी 09:00 वा . चे दरम्यान आष्टी येथे कलर पेंट घेण्यासाठी गेला असता, त्यांची अल्पवयिन मुलगी घरीच होती. अंदाजे सकाळी 10: 00 ते 2:00 वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी नामें वैष्णव गणपती मोटघरे रा जूनगाव तालुका पोंभुर्णा जी चंद्रपूर याने पीडित मुलीस फूस लावून पळवून नेले पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारि वरून पो स्टे आष्टी येथे गुन्हा दाखल करून श्री, अजय कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी सा. यांनी श्री कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, प्रानहिता याचे आदेशाने त्वरित तपासकामी टीम तयार केले व पो नी विशाल काळे यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड, पोलीस शिपाई सतीश गुडा, मपोशी पायल ताराम चापोशी राऊत चा हवा सहारे यांच्या टीम ने नमूद गुन्ह्यात तांत्रिक तपास करून संशयित आरोपी यांचे मोबाईल लोकेशन च्या आधारे कोटा राजस्थान येथून पीडित मुलगी व आरोपी नामें वैष्णव मोटघरे यांस ताब्यात घेण्यात आले आरोपी नामें वैष्णव गणपती मोटघरे यांस अटक करण्यात आली, नमूद गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबत तपास सुरू आहे.
