VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महसूल मंत्री महोदयांना उपसरपंच काशिनाथ बुरांडे याच्या नेतृत्वात विविध मागण्या संदर्भात निवेदन,
महाराष्ट्र/ मुंबई, २२ जून २०२५::- मौजा रेखेगाव येथिल शासकिय सर्व्हे नं. ३९ एकुण आराजी ५.१२ हे. आर जमा ४.७० रु. पै. हक्क वर्ग २ (महाराष्ट्र शासन काबील कारत) मध्ये सदर जागेवर मौजा – अनंतपूर गावासाठी १. क्रिडागण, २. स्मशानभुमी, ३. ढोरफोडी, ४. आकर ७/१२ व गाव नमुना ८ (अ) मध्ये शासनाच्या इतर अधिकारात निस्तार हक्काप्रमाणे नोंद करुन आदेश मिळणेबाबत निवेदन उपसरपंच काशिनाथ बुरांडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. मौजा – रेखेगाव येथिल शासकिय सर्वे नं. ३९ जमिनीचा खालील प्रभाणे तपशिल आहे.
मौजा रेखेगाव प. ह. नं. २० आमगाव (म.) मौजा रेखेगाव येथिल सर्व्हे नं. ३९ आराजी हे. आर. ५.१२ जमा ४.७० रु. पै. हक्क वर्ग (महाराष्ट्र शासन काबील कास्त) जागेमध्ये वरील विषयात नमुद केलेले,
१. क्रिडागण, २. स्मशानमुमी, ३. ढोरफोडी, ४. आकर इत्यादी बाबी अंदाजे ६० ते ७० वर्षापूर्वी पासून ते आजतागायत सदर जागेवर सुरु आहे.
परंतू शासनाच्या ७/१२ मध्ये इतर अधिकारात निस्तार हक्काप्रमाणे राखीव नाही. मौजा अनंतपूर गावासाठी हक्काचे कोणतेही उदा. १. क्रिडागण, २. स्मशानभुमी, ३. ढोरफोडी, ४. आकेर स्पेशल जागा नाही.
शासनाकडून येणारी कोणतेही योजना राबण्यासाठी जागा उपलब्ध १. व्यायामशाळा २.वाचनालय ३. अंगणवाडी ४. जि. पं. शाळा इत्यादी,
सदर गावासाठी जागा मौजा रेखेगाव प. ह. नं. २० अतंर्गत मौजा अनंतपूर येथिल सर्व्हे नं. ३९ मधील एकुण आराजी ५.१२ हे. आर. शासकिय जागा सदर उक्त विषयात नमुद केलेल्या बाबी करीता ७/१२ नोंद करण्याची निवेदनातून मागणी केली.
