Wednesday, July 29, 2026
HomeSironchaसिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का; अजित पवार...

सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का; अजित पवार गटात नगरसेविकांचा प्रवेश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/सिरोंचा, ०१ऑगस्ट २०२५::- सिरोंचा नगर पंचायतमध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) गोटात असलेल्या नगरसेविकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटात प्रवेश केला. या निर्णयामुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या प्रवेशामध्ये आमदार मा. डॉ. धर्मरावबाबा आत्राम ( माजी कॅबिनेट मंत्री)यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची प्रमुख भूमिका होती. या घडामोडींमुळे शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे.या राजकीय बदलामध्ये नगर उपाध्यक्ष श्री. बबलू पाशा आणि श्री. जगदीश रालाबंडीवार यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून हे मोठे वळण घडले, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.या प्रवेश सोहळ्यात सपना समय्या तोकला आणि महेश्वरी संजय पेद्दापेल्ली या नगरसेविका व समय्या तोकला अध्यक्ष वाल्मिकी सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था, संजय पेद्दापल्ली सामाजिक कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केले. या प्रसंगी राजेश बंदेला नगरसेवक, नागराज गणपती उपसरपंच जानमपल्ली यांनी उपस्थित होते. यामुळे येत्या नगर पंचायत निवडणुकीवर याचा थेट प्रभाव पडू शकतो.संपूर्ण घडामोडीमुळे सिरोंच्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आगामी राजकीय डावपेचांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular