VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याचे विकास परिषद चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे आवाहन,
गडचिरोली/चामोर्शी, ०७ ऑगस्ट २०२५::- ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शनिवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली द्वारे गडचिरोली शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत मुलांसाठी इंदिरा गांधी चौक ते न्यायालयीन असे पाच किलोमीटर अंतर ठेवण्यात आले तर मुलींसाठी इंदिरा गांधी चौक ते आय टी आय चौकापर्यंत तीन किलोमीटर अंतर ठेवण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ सकाळी सहा वाजता ठेवण्यात आली आहे.मुलांसाठी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सात हजार रुपये द्वितीय सहा हजार रूपये तृतीय पाच हजार रुपये, चतुर्थ चार हजार रुपये पाचवे तीन हजार रुपये, सहावे दोन हजार रुपये बक्षीस तर मुलींसाठी प्रथम पाच हजार रुपये, व्दितीय चार हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये चतुर्थ दोन हजार रुपये, पाचवे एक हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले.
तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला मुलीसाठी पाच प्रोत्साहन पर बक्षीस पाचशे रुपये ठेवण्यात आले*. *या मॅरेथॉन स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन विकास परिषदे चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे.
