Tuesday, September 15, 2026
HomeSironchaभारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांचे प्रमुख उपस्थितीत सिरोंचा तालुका विस्तारीत...

भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांचे प्रमुख उपस्थितीत सिरोंचा तालुका विस्तारीत कार्यकारणी बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/सिरोंचा, १३ ऑगस्ट २०२५::- दिनांक 12.08.2025 रोजी बैठीकित भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष मा. प्रद्यापक रमेशजी बारसागडे, मा. माजी आमदार डाँ. नामदेव उसेंडी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाऊ नरहरी, जिल्हा सचिव संतोष अण्णा पडालवार यांनी मार्गदर्शन केलें.

भाजपा सिरोंचा तालुका अद्यक्ष श्रीनाथ राऊत यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली.

बैठकित आदी तालुका व जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आलं. तसेच हर घर तिरंगा, रक्षा बंधन आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणूक बाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

गेल्या विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भाजपाचे समार्थनात महाराष्ट्र मध्ये अनेक आमदार निवडून आले होते परंतु आज आमदार बनल्यावर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणूकित आम्ही स्वतंत्र लढू असे बोलताना दिसत आहे. जर अशी परिस्थिती आल्यास महायुती म्हणून सोबत आल्यास ठीक आहे अन्यथा देशात आणि राज्यात आपली सत्ता आहे. आपण कोठे कमी पडत नसून आपण स्वतंत्र निवडणूक लढू असे ग्वाही मा. जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे आपल्या भाषाणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलें.

कार्यक्रमात जेष्ठ नेते रमेशजी बुरसे, सत्यनारायण मंचालवार, संदीप राचर्ला, सतीश गंजीवार, गजानन कलक्षपवार, शामसुंदर मेचीनेनी, तालुका महामंत्री मधुकर निलम, रमेश मुंगीवार, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, संगर्ती मलन्ना, चंद्रशेखर चेम्माकारी, सौ. संतोषा भरत कलक्षपवार, तालुका सचिव राजेश संतोषपु, तालुका सोशल मीडिया प्रमुख नागेश ताडबोईना, तालुका युवामोर्चा अध्यक्ष संदीप गंजीवार, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष संपत दया, तालुका आदिवासी आघाडी अध्यक्ष सुरेश मडावी, तालुका दलित आघाडी अध्यक्ष श्रीधर आनकरी, तालुका किसान आघाडी अध्यक्ष सत्यनारायण जिडीवार, तालुका महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष महेश्वरी गड्डमवार, तालुका अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष शारुख खान, भाजपा कार्यकर्ते शाम बेज्जनीवार, सौ.किरण कूलसंगे, सौ. पानेमवार, देवेंद्र रंगु,माधव कासर्ला, रवी चकिनारापू, विजय कलक्षपवार, सोमन्ना दुर्गम, नारायण मुडीमडिगेला, बेडके तिरुपती, चंटी गज्जेला, राजन्ना कोत्तपल्ली, आकाश रंगूवार, आदर्श सिरंगी, निखिल वेमुला, शाम जिल्लेला संतोष मुलकला, रवी कुम्मरी असे महिला व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular