Tuesday, September 15, 2026
HomeChamorshiदुचाकी स्वराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर...

दुचाकी स्वराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/ Chamorshi, २५ ऑगस २०२५::- आष्टी ते मुलचेरा रोडवरील दुचाकी अपघातात एक ठार तर दोन तरुण गंभीर झाले आहेतपोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात मुलचेरा रोडवर आष्टी पासून सहा किलोमीटर अंतरावर दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडलगत असलेल्या अपघात नियंत्रण दगडाला व झाडावर दुचाकी धडकून अपघात झाला.

अपघातात दुचाकीवरील तिघेही तरुण फेकल्या गेले त्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२५ ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तिन तरुण मुलचेरा कडून आष्टी कडे येत असताना दुचाकी क्र. एम एच ३४ बी डब्ल्यू ४९०९ वरील ताबा सुटला व अपघात झाला यामध्ये लवकुश सदाशिव गोरडवार वय ३१ वर्षे रा. घोसरी (नांदगाव) याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय राजेश्वर वाकुडकर वय २७ वर्षे रा. नादगाव (घोसरी), शुभम वाकुडकर वय ३० वर्षे रा. गोडाळा ता. मुल जिल्हा चंद्रपूर हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत.

आष्टी पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह व जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular