VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ धानोरा, ०९ सप्टेंबर २०२५::- धानोरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेले दूधमाळा येथील क्षेत्र साह्यकांचे कार्यालय कधी बंद तर कधी उघड्लेल्या अवस्थेत दिसत असते.कार्यरत क्षेत्रसहाय्यक आपल्या कार्यालयीन निवासस्थानात कधीच राहताना दिसत नाही.क्षेत्र साह्यकांचे कार्यालपुढे कार्यरत असलेले वन चौकीदार कार्यालयाचा दरवाजा उघडून गेटच्या समोर बसलेल्या अवस्थेत कार्यालयाची देखरेख करतांना दिसत असतो.क्षेत्र साह्यकांच्या भेटीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीससाहेब आताच कुठेतरी गेले असे सांगून येणाऱ्या जाणाऱ्यांचे कार्यरत वनचोकीदार समाधान करताना दिसत असतो.
कार्यरत असलेले क्षेत्रसहाय्यक नित्य नियमांनी आपल्या कार्यालयीन निवासस्थानात राहण्याची मागणी गावकऱ्यात बोलली जात आहे.आमचे सदर प्रतिनिधी दूधमाळा येथील क्षेत्रसाह्यकाच्या कार्यालयाला तिन ते चारदा भेट दिली असता क्षेत्रसहाय्यक आपल्या मुख्यालयाला राहत नसल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
