VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ चामोर्शी, १५ सप्टेंबर २०२५::- ग्रामीण फुटबॉल स्पर्धा ठाकूरनगर ता. चामोर्शी १४ सप्टेंबर २०२५ ठाकूरनगर येथे श्रीकृष्ण स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा मान मला लाभला. या स्पर्धेत विविध गावांतील संघांचा सहभाग असून विजेत्या संघाला आकर्षक चषक व पारितोषिक देण्यात येणार आहे.खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त, टीमवर्क, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढीस लागते.
आजच्या तरुणांनी मोबाईल व सोशल मीडियामध्ये गुंतून न बसता पुन्हा खेळाच्या मैदानावर परत यावे आणि आपल्या बालपणीच्या खेळसंस्कृतीला नवा जोम द्यावा, अशी वेळेची गरज आहे.अशा ग्रामीण पातळीवरील स्पर्धांमुळे गावागावात क्रीडा संस्कृती बळकट होते, नवे खेळाडू तयार होतात आणि त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळते.
ग्रामीण भागातील क्रीडा सुविधांसाठी सरकारकडून तसेच माझ्याकडून प्रयत्नशील राहू.तरुण खेळाडूंनी आपल्या प्रतिभेचा विकास करून मोठ्या मंचावर नाव कमवावे, हीच माझी अपेक्षा आहे.यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सतीश रॉय, श्री. विलासजी उईके, श्री नीरज रामानुजनवार, श्री नरेशजी अलसावार, माधुरी मैत्र ग्राम पंचायत सदस्य, देवदास फौजदार, शिव हलदार, व सहकारी उपस्थित होते.
