Thursday, October 29, 2026
HomeBrahmapuriब्रह्मपुरीत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे जंगी स्वागत...

ब्रह्मपुरीत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे जंगी स्वागत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ देवराव होळी कडून युवा जिल्हाध्यक्ष तनय देशकरांचा सत्कार,

गडचिरोली /ब्रह्मपुरी, २९ जून २०२६::- भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी ब्रह्मपुरी येथे माजी आमदार अतुल देशकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी तनय देशकर यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी तनय देशकर यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ब्रह्मपुरी भाजपा परिवाराच्या वतीने आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर प्रथमच ब्रह्मपुरी येथे आगमन झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा माजी आमदार अतुल देशकर तसेच भाजपा ब्रह्मपुरीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत, आगामी राजकीय घडामोडी तसेच आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या कार्यक्रमाला डॉ. सुयोग बाळबुद्ये, दीपक उराडे, प्रकाश बगमारे, वर्षा चौधरी, सांकेत भानारकर, अरविंद नंदुरकर, मनोज भूपाल, पवन जयस्वाल, प्रा. जुमडे, अशोक सालोटकर, प्रकाश लोखंडे, संजय लांबे आदी पदाधिकाऱ्यांन सह भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular