Friday, May 22, 2026
HomeBhamragadभामरागड तालुक्याशी जोडणारे अर्धवट पुलयाचे काम त्वरित पूर्ण करा - राकेश बेलसरे...

भामरागड तालुक्याशी जोडणारे अर्धवट पुलयाचे काम त्वरित पूर्ण करा – राकेश बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख ( शिंदे गट) मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शेकडो कार्यकर्ते सोबत भामरागडच्या तहसीलदारांना निवेदन,

गडचिरोली / भामरागड, २१ सप्टेंबर २०२५::- तालुक्यातील विविध नाल्यावरील पुलाअभावी पावसाळ्यात भामरागड तालुका मुख्यालयाशी शेकडो गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे नवीन व अर्धवट पुलांचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने निवेदन द्वारे शासनाला केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक नदी नाल्यावर पुल न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

कुणी आजारी पडल्यास त्याला रुग्णालयात नेणे शक्य होत नाही. त्यामुळे आजपर्यंत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.तसेच यावर्षी पावसाळयात पाच जणांचा बळी गेला. हे सर्व बळी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे नाल्यातून वाट काढताना फक्त चार असून याकडे गंभीर लक्ष देवुन भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा ते इरपणार, होड्री ते लष्कर, धोडराज ते जुवी, धोडराज ते इरपणार, अर्धवट स्थितीत असलेला लाहेरी ते गुंडेनुर, कुचेर ते खंडी, नैनवाडी, कोडफे, गोंगवाडा ते नेलगुंडा व मिडदापल्ली नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भामरागडच्या तहसीलदारांकडे केली.यावेळी शिवसेनेचे भामरागड तालुका प्रमुख सुधाकर तिम्मा, अरुण सेडमाके साई चंदनखेडे, चत्रु मडावी,भंवरसाय माझी, संतोष बारापात्रे, कपिल पाल, अमोल पंदिलवार, आकाश पुपलवार , रवी भांडेकर व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular