VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली / कोरची, २२ सप्टेंबर २०१५::- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगुल येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पहिल्यांदाच भेट देऊन भाजपा कार्यकर्त्याचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना सेवा पंधरवाडा सप्ताहात आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, गावातील स्वच्छता, नागरिकांच्या भेटी घेऊन केंद्र तथा राज्य सरकारचे जनलोक उपयोगी कार्य लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करावी.
या बैठकीत आगामी जि. प., पं. स. तसेच नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाची काय राजकीय दिशा राहील यासंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन झाले.
यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करून येणाऱ्या स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरून जिल्ह्यातील 12 ही पं. स. तसेच 3 नगर परिषद व झेड पी वर झेंडा फडकणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यासाठीच आतापासूनच सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे.
असे प्रतिपादन या वेळी केले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पहिल्यांदाच कोरची तालुक्याचा दौरा केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.या प्रसंगी सदाराम नरुटी भाजपा तालुकाध्यक्ष कोरची, आनंदी चौबे, नसरुद्दीन भामानी, भाजपा अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष देवराव गजभिये, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी, दिलीप कोवाची, नीलकंठ जाडे, रामलाल मुलेटी, श्यामलाल राहुल, ईश्वर कोरेटी, चिंताराम सोमफूल, हेमंत कुंमरे, पुरुषोत्तम कोल्हे, संतानु सोनकुकरा, शालिक शोरी, संगीता कोवाची, संगीता कोरेटी, कृती सरकार, इमलाबाई सोनकलस, गीता दरो आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.या सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प करत भाजपा गडचिरोली जिल्हात दृढपणे पुढे जात आहे.
भारतीय जनता पार्टी – सेवा हीच संघटना.
