Friday, August 7, 2026
HomeKorachiस्वातंत्र्यानंतर प्रथमच देहानटोला उजळला; गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच देहानटोला उजळला; गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदासजी मसराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; वीजपुरवठा योजनेचे लोकार्पण,

गडचिरोली /कोरची,०७ ऑगस्ट २०२६::- स्वातंत्र्यानंतर तब्बल अनेक दशके वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत आर्मुरकसा अंतर्गत येणाऱ्या देहानटोला या दुर्गम गावाचा अखेर अंधार दूर झाला. आमदार रामदासजी मसराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावात वीज पोहोचली असून, ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या हस्ते वीजपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

गावात वीज नसल्याने आजवर ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. दैनंदिन जीवनासोबतच गावाच्या विकासालाही विजेअभावी मोठा अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन आमदार रामदासजी मसराम यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच देहानटोला विद्युत प्रकाशाने उजळून निघाला. वीजपुरवठा सुरू होताच ग्रामस्थांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला.

वीज उपलब्ध झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही सकारात्मक बदल घडणार आहे. तसेच भविष्यातील विविध विकासकामांना गती मिळून देहानटोला गावाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

वीजपुरवठा योजनेचे लोकार्पण झाल्यानंतर ग्रामस्थांनी आमदार रामदासजी मसराम यांचे आभार मानले. दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

लोकार्पण सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती :-

यावेळी माजी सभापती परसरामजी टिकले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कुरखेडा) जिवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कोरची) मनोज अग्रवाल, धनपाल मिसार सर, उपविभागीय अभियंता जांभूळकर, माजी सभापती श्रावण मातलाम, उपसरपंच परमेश लोंहबरे, राजेश नैताम, दानशूर हलामी, आत्माराम ब्राह्मणकर, असरसिंग नरुटी, रविंद्र आर. उईके, दिनेश जाळे, सुनील तुलावी, महादेव जाळे, अर्जुन मुलेटी, तलवार हिडामी, दशरथ हिडामी, राजेश मुलेटी, मनोज उईके, सूरज हिडामी, प्रकाश भारद्वाज, सुलोचना जाळे, राधा कोडाप, रिना जाळे, प्रभाबाई हिडामी, देवंतीन टेंभुर्णे, कमलाबाई जाळे, सामबाई पुटो, अहिल्या पुटो, रविंद्र जाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक दशकांचा अंधार दूर करून देहानटोला गावात विजेचा प्रकाश पोहोचल्याने हा दिवस ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक ठरला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular