Saturday, May 23, 2026
HomeChandrapurआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ खत पुरवठा...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ खत पुरवठा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी १७०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध,

आ. श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर झाले जिल्ह्यासाठी नियोजन,

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मानले आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार,

चंद्रपूर, २२ सप्टेंबर २०२५::- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या आत खत टंचाईची समस्या सुटली आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले होते, त्यानंतर आज, सोमवार, दि. २२ सप्टेंबरला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुढच्या टप्प्यात उद्या, मंगळवार, दि. २३ सप्टेंबरला १६०० मेट्रिक टन युरिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular