Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiमेरा युवा भारत, गडचिरोली तर्फे लखमापूर बोरी येथे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण...

मेरा युवा भारत, गडचिरोली तर्फे लखमापूर बोरी येथे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, २४ सप्टेंबर २०२५::- चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील जय तिरुपती भाद्रपद गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त दहा दिवसीय उपक्रमा अंतर्गत विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मेरा युवा भारत व गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम चामोर्शी नगरपंचायतच्या नगरसेविका तथा भाजपाच्या तालुका मंडळ अध्यक्षा रोशनी स्वप्नील वरघंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत २० सप्टेंबर रोजी पार पडला .

येथील जय तिरुपती भाद्रपद गणेश मंडळ (माता मंदिर) च्या वतीने युवक सहभागातून युवक व बालकांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवाचे दहा दिवस दहा उपक्रमांतर्गत वेशभूषा स्पर्धा, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, माता मंदिराच्या सरंक्षण भिंतीची रंग रांगोटी, हिंदी भाषेचे महत्व या विषयावर निबंध स्पर्धा, व्याख्यान कार्यक्रम, मूर्ती बनविणे स्पर्धा, खरड्याचे गडकिल्ले, आकाश कंदील बनविणे व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रोशनी वरघंटे ह्या होत्या तर मुख्य अतिथी म्हणून सहाय्यक ग्रामकृषी अधिकारी स्मिता निमगडे, मारोडा क्षेत्राचे सहाय्यक, ग्राम कृषी अधिकारी मयुरी दामदार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनटक्के, उपसरपंच विनोद भोयर, माजी उपसरपंच सुखदेव बोदलकर, नामदेवजी दूधबळे, माजी तंमूस अध्यक्ष प्रकाश सातपुते, रवींद्र आरेकर उपस्थित होते.

निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना मेरा युवा भारत, गडचिरोली तर्फे ट्रॉफी देण्यात आली व सर्व स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांचे हस्ते आकर्षक बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना दिलखुश बोदलकर यांनी केले तर आभार दिलखुश नैताम यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular