Saturday, May 23, 2026
HomeChamorshiदेवतळे महाविद्यालयात विश्व पर्यटन दिवस साजरा...

देवतळे महाविद्यालयात विश्व पर्यटन दिवस साजरा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, २७ सप्टेंबर २०२५::- स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. डी.जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी विश्व पर्यटन दिवस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्यांविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एम. झाडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. जयश्री बोबाटे, प्रा.चापले तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक बाबणवाडे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी युनेस्को ने दखल घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विश्व पर्यटन दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रोशन गेडाम, प्रा.संन्याशी मंडल यांनी सहकार्य केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular