Monday, September 14, 2026
HomeDesaiganjराहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्यावर तक्रार दाखल...

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्यावर तक्रार दाखल…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची कारवाई,

गडचिरोली/देसाईगंज, ०५ ऑक्टोबर २०२५::- देशाचे विरोधी पक्ष नेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा. राहुल गांधीजी* यांना केरळ राज्यातील भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या संतापजनक घटनेचा निषेध करत आज देसाईगंज येथे काँग्रेस पक्षाने तीव्र भूमिका घेतली. या विरोधात आज आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.या वेळी

आमदार रामदास मसराम म्हणाले:-

“राहुल गांधी हे देशाच्या संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढणारे धैर्यवान नेते आहेत. अशा नेत्याला धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. ही धमकी केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण लोकशाहीवर आहे.”

आमदारांनी पुढे सांगितले की, राहुल गांधींनी “भारत जोडो यात्रा” व “भारत न्याय यात्रा” द्वारे देशात प्रेम, समानता आणि बंधुतेचा संदेश दिला. या प्रवासात त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळेच काही असहिष्णु विचारसरणीचे लोक चिडून अशा धमक्या देत आहेत. “ही प्रवृत्ती रोखली नाही तर देशात लोकशाही धोक्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रसंगी युवा विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भर्रे, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मनोहर निमजे, माजी जिल्हा परिषद सदस्य ममता पेंदाम, विलास बनसोड, काँग्रेस क,शहराध्यक्ष विजय पिल्लेवान, ओबीसी काँग्रेस सेल तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, सागर वाढई, जावेद शेख, जुमनाके साहेब,आरतीताई लहरी, रजनीताई आत्राम, अरुण कुंभलवार, संदीप वाघाडे, परशुराम ठाकरे, जितेंद्र चौधरी,विकास प्रधान, गुलाब नंदेश्वर, मडावी साहेब विसोरा धनपाल आदे,अमर बगमारे,साजन मेश्राम, पवन गेडाम तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय आदींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी “राहुल गांधी अमर रहें”, “लोकशाही जिंदाबाद”, “भाजपचा निषेध असो” अशा घोषणा देत निषेध नोंदवला.स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, जर संबंधित भाजप प्रवक्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आणि सर्व स्तरांवरून या धमकीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular