VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
देशात भाजपा राज्यात भाजपा आता जिल्हा परिषदेवर सुद्धा भाजपा निवडून आना,
गडचिरोली/ चामोर्शी, २५ ऑक्टोबर २०२५::- गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील विकासपल्ली येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश भाऊ गेडाम राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी श्री.श्री.काली माता उत्सव निमित्याने महाप्रसाद कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व या ठिकाणी उपस्थित राहून मंदिरात कालीमातेचे दर्शन घेतले.

यावेळी उपस्थित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले शासकीय नोकरीचे वीस वर्षात या जिल्हा परिषद क्षेत्रात काम ग्राम सचिव असताना या भागाचा कायापालट करण्याचा माझा संकल्प होता आणि त्या वेळेपासून माझा या भागातील अनेक विकास कार्य केले.

पुन्हा या भागाला विकासाचा रोल मॉडेल म्हणून तयार करणे हा माझा स्वप्न आहे व या भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांसोबत पारिवारिक स्नेहबंध आहेत आणि आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताना जास्तीत जास्त वेळ रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातच मी देतो, या क्षेत्राचा कायापालट हाच माझा ध्यास आहे व येथील गोरगरीब शोषित वंचित आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करण्यासाठी अविरत कटिबद्ध राहील असे प्रतिपादन केलेव सांगितले.

रेगडी हळदवाही ही माझी कर्मभूमी आहे मागील लोकसभेला हा जिल्हा परिषद क्षेत्र मायनस होता परंतु या विधानसभा निवडणुकीत पक्षाने मला या भागाचा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली व त्या संधीचे सोने करून या भागात माझ्या नेतृत्वात तमाम मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादामुळे प्रचंड बहुमत मिळवून दिला व या भागातील नागरिकांचा स्नेह हाच माझ्या जीवनातील खूप मोठा अमूल्य ठेवा आहे.

तमाम मतदार बंधू आणि भगिनी यांनी पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत राहावे.देशात भाजपा,राज्यात भाजपा, आता जिल्हा परिषदेवर सुद्धा भाजपा आणा असे आवाहन डॉ. प्रणय खुणे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश भाऊ गेडाम यांनी केले .
