Friday, July 31, 2026
HomeChamorshiकोठरी अरण्यवासातील वर्षावास समापन सोहळ्याला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव...

कोठरी अरण्यवासातील वर्षावास समापन सोहळ्याला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कोठरी येथील अरण्यवासाच्या विकासासाठी दोन कोटी साठ लाख रुपयांची विकासकामे करून पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्यात माजी आमदार डॉ देवराव होळी यांची मोलाची भूमिका.

गडचिरोली/चामोर्शी, २५ ऑक्टोबर २०२५::- चामोर्शी तालुक्यातील कोठरी येथे 22 वा वर्षावास समापन सोहळा पार पडला. दिनांक 24 ऑक्टोंबर शुक्रवारी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी कोठरी अरण्यवासात जावून जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून बौध्द विहारात उपासना केली. व भंते भगीरथ यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी बौध्द विहाराच्या सोयीसुविधांविषयी चर्चा केली. व अपूर्ण कमासाबंधी लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली.

धनदाट जंगल परीसरात असलेल्या पवित्र बौध्द विहारस्थळी जाण्यासाठी रस्ता नव्हता, विजेची सोय नव्हती, त्यामुळे उपासकांना या ठिकाणी जाण्यासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता.हे सर्व लक्षात घेता डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात कोठरी येथे दोन कोटी रुपयांचे रस्ते मंजूर केले व विद्युत जनित्र व खांबासाठी साठ लाख रुपयांचा निधी खेचून आणत कोठरी अरण्यवासाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात मोलाचा हातभार लावला.

डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्यामुळे कोठरी अरण्यवासाला क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. आता ब दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही डॉ. देवराव होळी यांनी दिली. गेल्या 22 वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या बौध्द धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या कोठरी येथे विकासकामे डॉ देवराव होळी यांच्या कार्यकाळात झाल्यानें बौध्द धर्मियांनी त्यांचें विशेष आभार मानले *भदंत भागीरत महस्थवीर, भदंत महस्थवीर नागदीप गुणवंत डोर्लिकर प्रवीण मुंजमकर प्रवेश बांबोळे जतिन वाघमारे, ज्ञानेश्वर नगराळे आदी उपस्थित होते.

या समापन सोहळ्यात वीस ते पंचवीस हजार बौध्द बांधवांनी कोठरी येथे उपस्थिती दर्शविली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular