VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ चामोर्शी,०८ नोव्हेंबर २०२५::- माननीय आमदार महोदय यांनी सोळा गाव पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने क्षेत्रातील जनतेने ही बाब आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांना लक्षात आणून दिले.

त्यानंतर तत्काळ संबंधित विभागांना पत्र देऊन आढावा बैठक घेण्यात आली त्या कामात दिरंगाई होत असल्याने अत्यंत नाराजी व्यक्त केली आणि येत्या सात दिवसात प्रत्येक घरी पाणी मिळाला पाहिजे अशा सूचना दिल्या.

कामात हयगय करणाऱ्या इंजिनीयर व ग्रामपंचायत सचिव यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
गावातील अंतर्गत पाईपलाईनच्या दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायत यांची असून तत्काळ दोन दिवसात ती पाईप लाईन व तोट्याचे काम त्वरित दुरुस्त करण्यात यावा असे निर्देश दिले.
पाईपलाईन दुरुस्ती सुरू असलेल्या प्रत्येक गावातील आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्यास सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत विसापूर रै, वालसरा, कुरुड आमगाव म येथील सरपंच व सचिव उपस्थित होते.
तसेच गटविकास अधिकारी येरमे मॅडम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपअभियंता बिष्णोई मॅडम, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर केशव भांडेकर, तालुका अध्यक्ष श्रीमती रोशनी ताई वरघंटे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकजी कोहळे, सुभाषभाऊ कोठोरे ग्राप सदस्य आमगाव ,भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नीरज रामानुजवार, ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ बारसागडे, भाजपा युवा मोर्चा तालुका महामंत्री जितेश बारसागडे तालुका सचिव विशाल माळवे, संबंधित विभागाचे इंजिनिअर,भाजपा कार्यकर्ते व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.
