Saturday, September 5, 2026
HomeAheriअहेरी शहरातील "बेघर कॉलनी" अशी ओढख बदलवून नागरिकांना मालकी हक्क व घरकुल...

अहेरी शहरातील “बेघर कॉलनी” अशी ओढख बदलवून नागरिकांना मालकी हक्क व घरकुल योजनेचा लाभ द्या…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी मुख्याधिकारी गणेश शहाणे ह्यांच्याकडे केली मागणी,

गडचिरोली/अहेरी,१२ नोव्हेंबर २०२५::- अहेरी शहरातील इंदिरानगर ( बेघर कॉलनी ) येथील अनेक कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून महसूल विभागाचा जागेवर वास्तव्यास राहतात परंतु त्यांच्याकडे जागेचे मालकी हक्क नाही, जमिनीचे पट्टे नाही ह्यामुळे अनेक शासकीय योजनाचा लाभ त्यांना मिळत नाही, तसेच ह्यातील अनेक कुटुंब कच्चा व पडक्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून राहतात ह्या सर्वांचा प्राधान्यक्रमाने विचार करून बेघर कॉलनीतील नागरिकांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजना 2 (शहरी ) ह्यातून त्यांना “घरकुल” मंजूर करावे तसेच “बेघर कॉलनी” अशी त्यांची ओढख बदलवावी अशी जोरदार मागणी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी ह्या कॉलनीतील नागरिकांसह अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेबांकडे काल निवेदन देत केले.

ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेबांनी सर्व नागरिकांनी तातडीने अहेरी नगरपंचायत कडे अर्ज करावे, येत्या 3 महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून नियमांत बसणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क देऊन नवीन घरकुल मंजूर करू असे आश्वासन ह्यावेळी दिले ह्यावर बेघर कॉलनीतील सर्व नागरिकांचे समाधान झाले, ह्यामुळे तब्बल 40 वर्षानंतर बेघर कॉलनीतील नागरिकांना आपल्या जागेचे मालकी हक्क तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळनार असल्याने सद्या त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे, निवेदन देतांना भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांच्यासह इंदिरानगर बेघर कॉलनीतील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular