VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/धानोरा,०७ जानेवारी २०२६::- धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेकीनमूडझा येथील शाळेत एकूण शाळेची पटसंख्या 36 असून या शाळेत एक ते पाच वर्गापर्यंत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही अत्यंत ज्वलंत बाब समोर आलेला आहे. म्हणून या शाळेत दोन किंवा अधिक शिक्षकांची अत्यंत गरज आहे.
त्यासोबतच पेंढरी व दुर्गापुर केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत 15 पेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षकांची भरती करण्यात यावे. कारण शिक्षकाकडे मुख्याध्यापक, अध्यापन, निवडणूक अधिकारी यांनी दिलेले बी एल ओ चे कामे व शाळेतील शैक्षणिक ऑनलाईनचे कामे असतात.
एकाच शिक्षकावर अनेक कामे होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून त्या त्या शाळेत एकापेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागेल. अशीही मागणी होत आहे.
