VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली / चामोर्शी,०७ जानेवारी २०२६::- चामोर्शी तालुक्यातील पंचायत समिती येथे आज भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भाऊ भांडेकर व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन नवी दिल्ली जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,व पदाधिकारी यांनी
सदिच्छा भेट घेतली व पंचायत समिती अंतर्गत कुरुड विसापूर (रै) जिल्हा परिषद क्षेत्र व रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना, स्थानिक पर्यटन स्थळ यांना (क )वर्ग दर्जा देणेबाबत,

प्रलंबित घरकुलाची देयक, जिल्हा परिषद च्या अनेक इमारती व जीर्ण शाळा व सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाकरिता रेतीची समस्या इतर महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा
करण्यात आले, यावेळी नवनियुक्त संवर्ग विकास अधिकारी उच्च श्रेणी मा, प्रकाश पोळ साहेब यांनी सकारात्मक पावले उचलत सर्व समस्या तात्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी बहादूरपूर येथील सरपंच रतन मंडल,
मंजेगाव येथील राजू सातपुते.सुकंठ रॉय,प्रदीप रॉय व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
