Wednesday, July 29, 2026
HomeSironchaजानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची काँग्रेसची मागणी...

जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची काँग्रेसची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर,

गडचिरोली /सिरोंचा,१४ फेब्रुवारी २०२६::- तालुक्यातील जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देण्याची मागणी तालूका काँग्रेस कमिटीने केली आहे.

           आज तालूका काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार ए.टी.सकुंदरवार व पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक बावणे यांना भेटून लाभार्थ्यांच्या समक्ष चर्चा घडवून आणत निवेदन सादर केले.

           यावेळी तहसीलदार ए.टी. सकुंदरवार व कक्ष अधीक्षक बावणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन-चार दिवसांत जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

          सिरोंचाचे तहसीलदार सकुंदरवार व कक्ष अधीक्षक बावणे यांना निवेदन देतांना तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी,काँग्रेसचे नेते व माजी उपसरपंच रवी सल्लम,सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार राजन्ना तोटा सह जानमपल्ली येथील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular