Saturday, September 19, 2026
HomeChamorshiविश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भेंडाळा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात...

विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भेंडाळा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी ०४ मार्च २०२६::-,विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भेंडाळा येथे सन २०००-२००१ च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा २०२६ नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल 25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.व्ही.पी. माधमशेट्टीवार होते, तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री.डी.पी.बारसागडे सर उपस्थित होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री.डब्लु.के.अर्जुनकर सर, श्री.डी.आर.बोकडे सर, श्री.के.के. खोब्रागडे सर,श्री.एन्.डी. जक्कुलवार सर,श्री.के.एच. घाटे सर, श्री.एम्.व्ही.जाधव सर,श्री.डी.डी. डांगे सर, श्री.के.डी.साखरे सर,श्री.व्ही.एस्. सुरपाम सर,श्री.डी.यु. दुधे सर,श्री.ए.एस्. चौधरी सर, हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून, दीप प्रज्वलन करून करण्यात आले. 

अरुणा सहारे, गुणवंता झाडे, विशाखा पालपल्लीवार, विद्या आभारे, संगीता लोळे, कपिला धोटे, यांच्या सुमधूर आवाजात; श्री.योगेश कन्नाके यांच्या उत्तम तबलावादन, श्री.योगेश गेडाम यांच्या उत्तम हार्मोनियम वादनातील स्वागत गीताने पाहुण्यांचं प्रथमतः स्वागत करण्यात आले. 

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :-

श्रद्धांजली: दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गुरुवर्य सन्मान: कार्यक्रमात उपस्थित सर्व गुरुवर्यांना शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांचा परिचय व मनोगत घेण्यात आले.

 पुन्हा भरली शाळा: विशेष म्हणजे, सर्व माजी विद्यार्थ्यांनी वर्गात (Classroom) बसून शिक्षकांच्या शिकवणीचा पुन्हा एकदा अनुभव घेतला, ज्यामुळे सर्वजण भावूक झाले होते.

नियोजन व संचालन :-

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मारोती चापले( मुख्याध्यापक, जि.प.उ. प्राथ.शाळा,मंगी(बु.),ता.राजुरा) यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.भारत तुंबडे (सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा) यांनी केले.

 तर आभार प्रदर्शन श्री.निशांत उराडे (पोलीस शिपाई, गडचिरोली) यांनी मानले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी निलेश येगलोपवार, विजय माचेवार, मुखरेश्वर तांगडे, भुवनेश्वर सातपुते, महेंद्र मशाखेत्री, शेषराव धोटे, अमोल सातपुते, गायत्री बारसागडे, अरुणा सहारे, संगीता लोळे यांच्यासह सन २०००-२००१ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे गुरु-शिष्यांच्या नात्यातील स्नेहबंध पुन्हा एकदा घट्ट झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular