Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiगुंडापल्ली येथे आदिवासी मेळावा उत्साहात...

गुंडापल्ली येथे आदिवासी मेळावा उत्साहात…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांचा नागरी सत्कार,

गडचिरोली/चामोर्शी ,३० मार्च २०२६::- जय पेरसापेन आदिवासी मंडळ,गुंडापल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य आदिवासी मेळावा शनिवारी (दि. २८ मार्च २०२६) मोठ्या उत्साहात पार पडला. 

या मेळाव्यात गडचिरोली विधानसभा क्षेत्रचे आमदार डॉ.मिलिंदभाऊ नरोटे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजय कंकडालवार व काँग्रेस नेते श्री.हणमंतू मडावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे जंगी स्वागत व नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली.उपस्थित पाहुण्यांचे फेटे बांधून,पुष्पगुच्छ देऊन तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले. 

यावेळी परिसरातील नागरिक,युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.अजय कंकडालवार यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण,संघटन आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

तरुणांनी समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच पारंपरिक नृत्य,लोकगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले,संपूर्ण परिसरात आनंददायी आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.आयोजकांनी कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. 

भोजन व्यवस्थेसह सर्व सोयीसुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

या भव्य मेळाव्यामुळे आदिवासी समाजात एकात्मता व बंधुभाव दृढ झाला असून, समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular