Tuesday, September 15, 2026
HomeAheriभाकपा तर्फे उपोषण तात्पुरते स्थगित...

भाकपा तर्फे उपोषण तात्पुरते स्थगित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मुख्याधिकाऱ्यांना सात दिवसात स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देश,

गडचिरोली /अहेरी,०७ एफ्रिल २०२६::- नगरपंचायत अहेरी येथील मुख्याधिकारी यांना स्ट्रीट व्हेंडर्सवरील विनानोटीस अतिक्रमण कारवाईबाबत उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सात दिवसांच्या आत स्पष्ट लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरते आंदोलन स्थगिती देऊन वेळ द्यावे अवश्य आम्ही न्याय करू असे सांगितले त्याचा शब्दाला मान देत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) तर्फे सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

रुग्णालय रोड व दानशूर चौक परिसरातील स्टॉलधारकांवर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भाकपा व स्थानिक विक्रेत्यांनी आंदोलन छेडले होते. संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवसाय हटविण्यात आल्याने संताप व्यक्त झाला होता.

वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यामुळे भाकपाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. अखेर या आंदोलनाची दखल घेत उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना सात दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, जर दिलेल्या कालावधीत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, व न्याय मिळवून परत त्याच जागी व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र स्वरूपात सुरू केले जाईल. तसेच, स्टॉलधारकांच्या उपजीविकेचा प्रश्न प्रलंबित राहिल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भाकपाकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular