Wednesday, July 29, 2026
HomeKorachiकैमुल येथे समस्या निवारणासाठी चर्चा सत्र...

कैमुल येथे समस्या निवारणासाठी चर्चा सत्र…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत संपन्न,

गडचिरोली /कोरची,१३ एफ्रिल २०२६::- तालुक्यातील कैमुल येथे विविध स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला आमदार श्री रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.

यावेळी कैमुल परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक समस्या नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांनी निदर्शनास आणून दिल्या. गावकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही आमदार श्री रामदासजी मसराम यांना सादर करण्यात आले.

आमदार मसराम यांनी सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत तात्काळ पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular