Sunday, November 1, 2026
HomeGadchiroliपक्ष संघटनासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचून जनतेच्या प्रश्नांसाठी झटावे – आ. डॉ. धर्मरावबाबा...

पक्ष संघटनासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचून जनतेच्या प्रश्नांसाठी झटावे – आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

रवींद्र वासेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांचा दशकपूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

मेळाव्यात जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय वाटचाल, बूथस्तरावरील मजबुतीकरण आणि युवकांना पक्षाशी जोडण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या पक्षविस्तारासाठी केलेल्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट होत असून युवकांचा पक्षाकडे वाढता कल असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

मेळाव्यात विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, युवक व महिला आघाडीचे प्रतिनिधी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular