VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,१४ जुलै २०२६::- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै रोजी चामोर्शी येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हा उपक्रम यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, चामोर्शी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगनाबोडी हेटी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद खोबे, ज्येष्ठ नेते रियाज शेख, चामोर्शी नगरसेवक सुमेध तुरे, काँग्रेस मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके, राजू धोडरे, प्रा. प्रेमानंद वालदे, गुरुदेव सातपुते, निलेश शिरसागर, प्रदीप भांडेकर, प्रवीण गव्हारे यांच्यासह शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक धनराज पोरटे, शिक्षिका श्रीमती वर्षा मानापुरे, वर्षा धाईत, तुषार चांदेकर, प्रवीण पोटवार, जीवनदास सिडाम, दिलीप दूधबावरे, वंदना रामटेके, राजश्री रामगीरवार, सिताराम भोयर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बारसागडे सर , शिक्षक देवकते व मारोती बारसागडे तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
