VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,२१ जुलै २०२६::- चामोर्शी शहरातील सर्व पात्र नागरिकांना मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने SIR (Special Intensive Revision) फॉर्म भरण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हे कॅम्प 20 जुलै व 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत नगर पंचायत, चामोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, माहिती दुरुस्त करणे अथवा आवश्यक बदल करण्यासाठी नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कॅम्प मध्ये येताना नागरिकांनी आधार कार्डासह आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, जेणेकरून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करून आपले मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे चामोर्शीतील सर्व नागरिकांनी या विशेष कॅम्प मध्ये सहभागी होऊन आपली मतदार नोंदणी अद्ययावत करावी, असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाने केले आहे.
