Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliपत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्यांसाठी २९ जुलैला जंतर-मंतरवर विराट आंदोलन...

पत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्यांसाठी २९ जुलैला जंतर-मंतरवर विराट आंदोलन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार; व्हॉईस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरमचे आवाहन,

गडचिरोली,२१ जुलै २०२६::- पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षितता आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विराट राष्ट्रीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल, वेब पोर्टल, युट्यूब, दैनिक, साप्ताहिक, मासिक, फ्रीलान्स, ग्रामीण तसेच जिल्हास्तरीय पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या राष्ट्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात महिनाभर राज्य व जिल्हा मुख्यालयांवर टप्प्याटप्प्याने धरणे, निदर्शने, मोर्चे आणि निवेदने सादर करण्याचे आंदोलन राबविण्यात येणार असून, या सर्व आंदोलनांचा समारोप २९ जुलै रोजी जंतर-मंतरवरील विराट आंदोलनाने होणार आहे.

या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारसमोर पत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कठोर कायदेशीर तरतुदी, सामाजिक सुरक्षा, आरोग्य व अपघात विमा, पेन्शन योजना, गृहनिर्माण योजना, ग्रामीण, फ्रीलान्स व डिजिटल पत्रकारांना अधिकृत मान्यता, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, शासकीय जाहिरात धोरणात पारदर्शकता तसेच राष्ट्रीय पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना यांसारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील सर्व पत्रकारांना या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यांच्या मते, हे आंदोलन कोणत्याही एका माध्यमातील किंवा एका वर्गातील पत्रकारांसाठी नसून देशातील प्रत्येक पत्रकाराच्या सन्मान, सुरक्षितता, सामाजिक हक्क आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठीचा सामूहिक लढा आहे. केंद्र सरकारने या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात यापेक्षाही व्यापक व प्रभावी लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, देशभरातील पत्रकारांनी राजकीय व वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या ऐतिहासिक राष्ट्रीय आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संदीप काळे आणि अनिल म्हस्के यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले असून, विविध राज्यांतून पत्रकार दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती दिली. पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular