VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण, भव्य आरोग्य शिबिर व जनसेवा सप्ताहाचे आयोजन,
गडचिरोली,२२ जुलै२०२६::- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि लोकाभिमुख व लोकप्रिय नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व लोकहिताचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या उपक्रमांत वृक्षारोपण कार्यक्रम, भव्य आरोग्य शिबिर आणि जनसेवा सप्ताह यांचा समावेश असून, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे.
याअंतर्गत बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, आयटीआय चौक, गडचिरोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव (ता. जि. गडचिरोली) येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.

यासोबतच जनसेवा सप्ताह राबविण्यात येणार असून, विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिम आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गडचिरोली जिल्हा संघटनेने या सेवा उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
